- चहातून विष दिल्याचा अंदाज
ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियातील विरोधी पक्षनेते अलेस्की नवाल्नी यांची प्रकृती खालावली आहे. सायबेरिया वरून मॉस्को येथे येत असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अलेस्की नवाल्नी यांच्या प्रवक्त्या किरा यारम्यश यांनी सांगितले की, अलेस्की नवाल्नी यांची प्रकृती खालावली असून ते सध्या कोमात आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
पुढे त्या म्हणाल्या, अलेस्की नवाल्नी यांना विमान प्रवाशादरम्यान कोणी तरी चहामध्ये विष मिसळून देण्यात आले आहे, असा अंदाज आहे. त्यांची तब्येत बिघडण्यापूर्वी त्यांनी केवळ चहा पिला होता. पोलीस या घटनेचा तपास घेत आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गरम चहामधून विष देण्यात आल्याने ते वेगाने शरीरामध्ये पसरल्याची शक्यता आहे. पोलिसांची एक तुकडीही रुग्णालयामध्ये दाखल झाली आहे.









