प्रतिनिधी / पर्वरी
‘कोरोना’ व्हायरस संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय यादृष्टीने पर्वरी येथील पुंडलिकनगर वसाहतीत रासायनिक फवारणीने निर्जंतुकीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. पेन्ह-दी-फ्रान्स पंचायतीचे पंच शामसुंदर कामत व येथील रहिवाशांच्या पुढाकाराने घरोघरी व अपार्टमेंट्समध्ये ही मोहीम राबविण्यात आली. मोहिमेसाठी लागणारा निधी येथील रहिवाशांकडून उभा केला गेला. मिलिंद लवंदे, नंदीश ब्याळ्ळी व आदित्य भंडारी यांनी सुसज्ज यंत्रणा उभी करून निर्जंतुकीकरणाचे काम एका दिवसात पूर्ण करण्यास सहकार्य केले.
या दरम्यान पंच शामसुंदर कामत यांनी नागरिकांना घरी राहण्याचे व सामाजिक अंतर राखून ‘कोरोना’ लढाई जिंकण्यासाठी पंचायतींना सहकार्य करण्याचे आवाहन केले.









