वार्ताहर / बांदा:
भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, यासाठी ‘पिकेल ते विकेल’ या अभियानांतर्गत शेतकऱयांना कृषी विभागाकडून सहाय्य करण्यात आले. इन्सुली- खामदेव नाका या ठिकाणी निगुडे येथील शेतकरी शर्मिला शांताराम नाईक व अरुण वासू शेगडे या दोन शेतकऱयांना दुकान लावण्यासाठी सहकार्य करण्यात आले.
जिल्हा कृषी अधीक्षक म्हेत्रे, आत्मा कृषी अधिकारी घोलप, उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे, तालुका कृषी अधिकारी माधुरी मुटके, मंडळ कृषी अधिकारी पापडे यांच्या उपस्थितीत सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या हस्ते शेतकरी बचतगटाच्या भाजीपाला स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे, शेर्ले सरपंच उदय धुरी तसेच सागर निगुडकर व शेतकरी उपस्थित होते.
संत शिरोमणी सावता माळी अभियानांतर्गत शेर्ले कृषी सहाय्यक एस. ए. बेळगुंदकर यांनी शेतकरी निवडून त्यांची शेतकरी गटांकडून भाजी विक्री व्हावी, यासाठी गट तयार केले. तसेच शेतकरी विक्रेत्यांना दुकान लावण्यासाठी प्रोत्साहन दिले.








