कृषी खात्याकडून सर्वेक्षणाचे 90 टक्के काम पूर्ण
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील 15 दिवसांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेती पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. बेळगाव तालुक्मयातील 1,382, खानापूर तालुक्मयातील 3,662 तर कित्तूर तालुक्मयातील 1050 हेक्टरमधील पिकांना फटका बसला आहे. विशेषकरून भातपिकाला मोठा फटका बसला आहे.
या पाठोपाठ मका पिकाचेही नुकसान झाले आहे. कृषी खाते, बागायत खाते आणि महसूल खात्याच्यावतीने नुकसानग्रस्त शेतीचा सर्व्हे सुरू आहे. आतापर्यंत तालुक्मयातील 90 टक्के नुकसानग्रस्त शेतीचा सर्व्हे पूर्ण झाला असून उर्वरित शेतीचादेखील सर्व्हे केला जात असल्याची माहिती कृषी खात्याने दिली आहे.
जोरदार अवकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या भातपिकाला मोठा फटका बसला आहे. अद्याप शिवारात पाणी साचून असल्याने पिके कुजून गेली आहेत. हातातोंडाशी आलेली पिके गेल्याने बळीराजा हतबल झाला आहे. कृषी खात्याकडून नुकसानग्रस्त पिकांचा सर्व्हे झाल्यानंतर तातडीने माहिती ऑनलाईन अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर शेतकऱयांना भरपाई दिली जाणार आहे. कृषी खाते आणि बागायत खात्याने नुकसानग्रस्त पिकांसाठी प्रतिगुंठा 68 रुपये भरपाई जाहीर केली आहे. नुकसान मोठय़ा प्रमाणात आणि भरपाई तुटपुंजी असल्याने शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासन करत असल्याच्या संतप्त प्रतिक्रियाही शेतकऱयांतून व्यक्त होत आहेत. एकीकडे लाखो रुपयाचे नुकसान झाले असले तरी शासनाकडून नाममात्र रक्कम भरपाई म्हणून जाहीर करण्यात येत आहे.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱयांनी तातडीने रयत संपर्क केंद किंवा कृषी खात्याच्या कार्यालयात भरपाईसाठी अर्ज दाखल करावा, असे आवाहनही कृषी खात्याचे उपनिर्देशक एच. डी. कोळेकर यांनी केले आहे.









