शाहूपुरी :
मास्कचा वापर न करणे व सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणायांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला. गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत पालिकेच्या पथकाने एकूण सत्तावीस जणांवर कारवाई करून 17 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
सातारा जिह्यात कोरोना बाधित यांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. सातारा शहरासह तालुक्यातही अशीच परिस्थिती असल्याने प्रशासनाकडून काही उपाययोजनांची तीव्रता वाढविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने मास्कचा वापर न करणे करण्याबरोबरच सोशल डिस्टन्स न पाळणे व निर्धारित घ्यावी वेळेत दुकान बंद न करणायांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.








