वृत्तसंस्था/ श्रीनगर
पुंछ जिल्हय़ातील सीमारेषेवर शुक्रवारी पाकिस्तानने गोळीबारासह उखळी तोफांचा मारा केला. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे दोन पोर्टर्स (लष्कराचे साहित्य वाहून नेणारे कर्मचारी) ठार झाले. तसेच अन्य तिघे जखमी झाले आहेत. भारतानेही या आगळिकीला चोख प्रत्युत्तर दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुंछ जिल्हय़ातील नियंत्रण रेषेजवळील गुलपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानने उखळी तोफांचा मारा केला. तसेच अंदाधूंद गोळीबारही केला. यावेळी गुलपूर सेक्टरमधील एका चौकीतून दुसरीकडे लष्कराचे साहित्य वाहून नेणारे दोन ‘पोर्टर्स’ ठार झाले. जखमी झालेल्या अन्य तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले. दरम्यान, पाकिस्तानच्या आगळिकीला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये पाकिस्तानच्या चौक्यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.









