वृत्तसंस्था/ राजौरी
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्हय़ात नियंत्रण रेषेवर बुधवारी पाकिस्तानने बेछूट गोळीबार केला. यामध्ये दोन नागरिक जखमी झाले आहे. जखमींना राजौरीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील आठवडय़ापासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. नियंत्रण रेषेजवळील गावातील ग्रामस्थांना याचा मोठा फटका बसत आहे. बुधवारी सकाळी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शाळकरी मुलीसह वृद्ध जखमी झाला. दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राजौरीतील सरकारी हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिली.








