ऑनलाईन टीम / श्रीनगर :
पाकिस्तानकडून नौशेरा आणि कृष्णाघाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. आज पहाटे साडेतीन वाजता कृष्णाघाटीत तर साडेपाच वाजता नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय सैन्यातील नायब सुभेदार शहीद झाले.
आज पहाटे साडेतीन वाजता कृष्णाघाटी सेक्टरमध्ये पाक सैन्याने अचानक गोळीबार केला. पाकच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर साडेपाचच्या सुमारास नौशेरा सेक्टरमध्ये
पाकिस्तानकडून उखळी तोफांचा जबर मारा करण्यात आला. तसेच गोळीबारही करण्यात आला. पाकच्या गोळीबाराला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.









