वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकचा वेगवान गोलंदाज 38 वर्षीय मोहम्मद इरफान याच्या मृत्यूच्या बातमीची अफवा संपूर्ण पाकमध्ये सोशल मिडियामार्फत पसरली. रविवारी सदर बातमी पसरल्यानंतर पीसीबीकडे अनेकांनी चौकशी केली. दरम्यान ही बातमी खोटी असून ती अफवा असल्याचे मोहम्मद इरफानने स्पष्टी केले.
मोहम्मद इरफानच्या मोटारीला अपघात झाला आणि या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. सदर बातमी खोटी आणि निराधार असून आपली प्रकृती सुखरूप असल्याचे मोहम्मद इरफानने आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे. या अफवेमुळे आपल्या कुटुंबियांची स्थिती खूपच गंभीर झाली होती. अशा अफवेवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मोहम्मद इरफानने आपल्या चाहत्यांना केले आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये मोहम्मद इरफानने आपला शेवटचा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळला होता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 109 बळी घेतले आहेत. त्याचप्रमाणे पाकचा बधीर क्रिकेटपटू मोहम्मद इरफानचा उदर भागात झालेल्या इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याची माहिती पीसीबीने दिली होती.









