वृत्तसंस्था/ कराची
पाकच्या कसोटी क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज अबिद अली याला अचानकपणे छातीत वेदना होवू लागल्याने त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.
कैद ए करंडक प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धेत अबिद अली सेंट्रल पंजाब संघाकडून फलंदाजी करत असताना त्याला छातीत वेदना जाणवू लागल्या. या संघाच्या संघ व्यवस्थापकानी लागलीच अबिद अलीला एका खासगी रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांचे उपचार चालू असून त्याच्या काही चाचण्या घेतल्या जाणार आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अबिद अलीने 9000 धावांचा टप्पा ओलांडला आहे.









