वाळपई / प्रतिनिधी
पश्चिम घाट परिसरात जैवविविधता मधील महत्त्वाचा घटक आहे. या परिसरामुळे आज मोठय़ा प्रमाणात वातावरणात समतोलपणा निर्माण झालेला आहे. जगातील समृद्ध असा इतिहास सांगणारा पश्चिम घाट परिसर असून त्याचे संवर्धन होणे आज काळाची गरज बनल्याचे प्रतिपादन गोवा राज्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी केले. सत्तरी तालुक्मयातील अंजुणे धरण प्रकल्पाला भेट देऊन त्यांनी एकूण परिसराची व धरणाची पाहणी केली व एकूण निसर्ग व जैविक संपत्ती याबद्दल आपले विचार व्यक्त केले.
राज्यपाल पिल्लई हे बेळगाव या ठिकाणी जात होते. यावेळी त्यांनी अंजुणे धरण प्रकल्पाला भेट दिली व एकूणच संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यानंतर आपला अभिप्राय व्यक्त करताना त्यांनी सभोवताली जैविक वनसंपत्ती व सुंदर जंगल संपत्ती याबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला. अशा प्रकारचे वातावरण हे खरोखरच स्वर्गसुख असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. या भागातील जनतेने येथील वनसंपदा व जैविक संपदा संवर्धित व रक्षित करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. यामुळे या भागातील जनतेचे पर्यावरणासंदर्भात असलेली संवेदना याची प्रचिती येत असल्याचे यावेळी ते म्हणाले.
अंजुणे धरण प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील भूगर्भात निर्माण झालेल्या पाण्याचा साठा यांच्या पार्श्वभूमीवर आज मोठय़ा प्रमाणात या भागातील जनतेने शेती बागायतीच्या माध्यमातून गोव्याच्या निसर्गसौंदर्यात महत्त्वाची भर घातलेली आहे. गोवा हे खरोखरच सुंदर आहे. या भागातील जनतेने आतापर्यंत आपल्या वेगळय़ा अशा आदरतिथ्य या संस्कृतीच्या माध्यमातून या निसर्गाला एक विशिष्ट यांचे योगदान दिलेले आहे. या भागातील जनतेचे पर्यावरणासंदर्भात असलेले विचार व संवेदना यांचा आदर्श इतरांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या भागामध्ये आज मुबलक प्रमाणात पाऊस लागतो. याचे खरे कारण या भागातील जंगल संपत्ती आहे . अशा प्रकारची जंगल संपत्ती रक्षण न झाल्यास त्याचे दुष्परिणाम येणाऱया काळात आपल्याला भोगावे लागणार असल्याचे उद्गार काढले व सत्तरी तालुक्मयातील जंगल संपत्ती या संदर्भात आदर्श गोव्याच्या इतर भागातील जनतेने घ्यावा अशा प्रकारचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
त्याचप्रमाणे अंजुणे या धरणाच्या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली या धरणाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून पावसाळी मौसमामधून पाण्याचा साठा याचा विनियोग उत्तर गोव्याच अनेक भागांमध्ये पिण्यासाठी होत आहे. सरकारने याचे योग्यप्रमाणात नियोजन केलेले आहे. या धरणाच्या माध्यमातून आज निसर्गाचे वैभव वाढलेले आहे. हा धरण प्रकल्प उभारण्यासाठी माजी मुख्यमंत्री व या भागाचे लोक नेते प्रतापसिंह राणे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्याच विचारधारेतून या प्रकल्पाची उभारणी झाली .यामुळे आज खऱयार्थाने गोव्याच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा प्रकर्षाने निर्माण झालेली आहे. विकासाच्या बाबतीत दूरदृष्टी असलेला नेता प्रतापसिंह राणे यांचे सत्तरी तालुक्मयाच्या व गोव्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान असल्याचे उद्गार यावेत यांनी काढले.
यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱयांनी त्यांना धरण प्रकल्प व सभोवतालच्या परिसराची सविस्तरपणे माहिती दिली.









