लम्पीबाबत जागृती, रोग नियंत्रणासाठी प्रयत्न
प्रतिनिधी /बेळगाव
जनावरांना लम्पी संसर्ग रोगाची झपाटय़ाने लागण होत आहे. रोगापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी चक्क शेतकऱयांच्या बांधावर जाऊन पशुपालकांना प्रतिबंधात्मक उपाय-योजनांबाबत जनजागृती केली.
तालुक्मयात लम्पीस्कीन रोगाने थैमान माजविले आहे. अनेक जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत सापडले आहेत. दरम्यान पशुवैद्यकीय खात्याकडून गावोगावी जनजागृती करून लम्पी प्रतिबंधक उपायाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे. खरीप हंगामातील भुईमूग, बटाटा, रताळी आणि सोयाबीन काढणीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बळीराजा शेतीकामात दंग असल्याचे दिसत आहे. शेतीकामात मग्न असलेल्या शेतकऱयांमध्ये जनजागृती करण्यासाठी पशुवैद्यकीय पथक शेतकऱयांच्या बांधापर्यंत पोहोचले आहे. खनगाव, अष्टे चंदगड परिसरातील शेतकऱयांना पशुवैद्यकीय खात्यामार्फत लम्पीबाबत घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
लसीकरण मोहीम
तालुक्मयात रोग नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. जनावरांच्या गोठय़ात धूर करा, बाधित जनावरे इतर जनावरांपासून स्वतंत्र बांधा, जनावरे चरण्यासाठी व धुण्यासाठी बाहेर सोडू नका शिवाय जनावरांची ने-आण थांबवा, अशा सूचनादेखील करण्यात आल्या.









