प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील नाखरे खांबटवाडी रस्त्यावर 3 फेबुवारी रोजी मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या मृत्यूचा धक्कादायक उलगडा झाला आह़े या महिलेला गैरकृत्यासाठी दुचाकीवरून जबरदस्तीने पळवून नेत असताना झालेल्या झटपटीत ती दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी होवून तिचा मृत्यू झाल्याचे आरोप पोलिंसानी ठेवले आहेत. याप्रकरणी पूर्णगड पोलिसांनी संशयिताला अटक केल़ी
दिगंबर सुधाकर शिंदे (मावळंगे) असे संशयिताचे नाव आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 फेबुवारी 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता नाखरे खांबटवाडी रस्त्यावर 38 वर्षीय महिला जखमी अवस्थेत आढळून आली होत़ी तिला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी तिला मृत घोषित केल़े या घटनेची नोंद पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली होत़ी महिलेच्या अंगावरील जखमांमुळे वाहनाच्या धडकेत या महिलेचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होत़ा
नाखरेत महिला आढळल्याने शंकेची पाल चुकचुकली
या महिलेबाबत नातेवाईकांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आल़ी यावेळी नातेवाईकांनी ती मावळंगेतील मंदिरात हळदी कुंकवासाठी गेली होती असे सांगण्यात आल़े गावच्या मंदिरात गेलेली ती महिला नाखरे खांबटवाडी रस्त्यापर्यंत कशी पोहचली, या प्रश्नाने पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकल़ी त्यानुसार पोलिसांनी पूर्णगड पोलिसांत घटनेची नोंद करून तपास सुरू केल़ा
आई आजारी असल्याचे कारण सांगून दुचाकीवर बसवल़े
पोलिसांच्या तपासामध्ये ही महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आटपून घरी जात असताना तिच्या ओळखीच्या दिगंबर शिंदे याने दुचाकी या महिलेजवळ थांबवून पावस येथे राहणारी तुझी आई आजारी आह़े, तिला बघण्यासाठी घरी सोडतो असे सांगून या महिलेला दुचाकीवर बसवल़े
दुचाकीवर झालेल्या झटापटीत पडून मृत्यू
दुचाकीवर पिडीत महिला बसताच दिगंबरने गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने दुचाकी नाखरे खांबटवाडी रस्त्याकडे वळवल़ी दुचाकी चुकीच्या रस्त्याने जात असल्याचे लक्षात येताच महिलेने दिगंबरला दुचाकी थांबवण्यास सांगितल़े दिगंबरने दुचाकी न थांबवल्याने महिलेने त्याच्याशी झटापट करण्यास सुरूवात केल़ी यावेळी दुचाकीवरून रस्त्यावर कोसळल्याने महिला गंभीर जखमी झाल़ी मात्र गंभीर जखमी झालेल्या महिलेला त्याच अवस्थेत सोडून दिगंबर याने घटनास्थळावरून पळ काढल़ा, असा आरोप पोलिंसानी ठेवला आहे.
पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी घटनास्थळाची पाहणी केल़ी यावेळी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुरेश गावीत उपस्थित होत़े तपासासाठी ग्रामीण पोलीस ठाण्यातील उदय वाझे, शहर पोलीस ठाण्यातील सुशांत पवार, पूर्णगड पोलीस ठाण्यातील 11 अंमलदार यांची 4 पथके तयार करण्यात आली होत़ी पोलिसांच्या तपासामध्ये दिगंबर शिंदे हा पिडीत महिलेला गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने दुचाकीवरून पळवून नेत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानुसार दिगंबर याच्याविरूद्ध भादवि कलम 304 व 366 नुसार गुन्हा दाखल करण्यात आली आह़े
प्रत्यक्षदर्शी महिलांमुळे दिगंबर अडकला
पोलिसांकडून चौकशी सुरू असताना दोन महिलांनी दिगंबरला ‘त्या’ महिलेला दुचाकीवर बसवून नेताना पाहिल्याचे सांगितल़े त्यानुसार पोलिसांनी दिगंबरला चौकशीसाठी ताब्यात घेतल़े तपासाच्या प्रारंभी दिगंबरने पोलिसांना उलटसुलट उत्तरे दिल़ी मात्र पोलिसांनी ‘खास’ पध्दतीने चौकशी सुरु करताच त्याने संपूर्ण घटनेचे कथन पोलिसांपुढे केल़े
…









