रस्त्यावर सर्वत्र खड्डे, बेवारस गाडय़ांचे पार्किंग
विषेश प्रतिनिधी / पर्वरी
पर्वरी ओ- कोकेरो सर्कल ते सांगोल्डा पर्यंतचा चोगम रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. पावसामुळे मोठ मोठे खड्डे पडले असून या ठिकाणाहून गाडी चालविताना नाकीनऊ येतात. हा रस्ता पूर्ण खराब झाला आहे. गेले दोन दिवस पाऊस नसल्याने या रस्त्यावर सर्वत्र धुळ पसरलेली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक तसेच नागरिकातून होत आहे.
ओ-कोकेरो सर्कल ते सांगोल्डा पर्यंत रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. या वर्षी पाऊस जास्त पडल्याने या खड्डय़ामध्ये पाणी साचून खड्डय़ांचे आकार वाढले आहेत. पाऊस पडल्यावर सर्व रस्त्यावर हे पाणी साचत असते. त्यामुळे वाहनचालकांना खड्डय़ांचा अंदाज कळत नाही. यामुळे अपघात होण्याची शक्यताही असते. तसेच खड्डे मोठे असल्याने गाडय़ाचेही नुकसान होतात. तसेच पाऊस नसल्यावर या खडडय़ामध्ये धुळ साचते व सर्व आजूबाजूच्या दुकानाध्ये तसेच रस्त्यावर जाणाऱया वाहनचालकांना मनस्ताप होतो. रस्त्याच्या मधोमध पोलिसांनी बॅरीकेट्स घातले आहे. या रस्त्यावर गाडी चालविण म्हणजे कसरत करावी लागत आहे. पूर्ण पावसाळा लोकांनी या खड्डय़ामधून काढला निदान आतातरी स्थानिक आमदारांनी याची दखल घेऊन या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे.
रस्त्याच्या बाजूला बेवारस गाडय़ा
या रस्त्याच्या बाजूला बेवारस अनेक गाडय़ा धूळ खात पडल्या आहेत. या पर्यटकांच्या गाडय़ा जाहीराती असलेल्या गाडय़ा तसेच अनेक बिनउपयोगी गाडय़ा पार्क करुन ठेवल्या आहे. या रस्त्यावरुन गाडय़ाची वर्दळ खूप असते. या रस्त्यावरुन पिळर्ण कांदोळी, सांगोल्डा अशा अनेक ठिकाणी गाडय़ा जात असल्याने अनेक वेळी वाहतूक कोंडीही होते. अशा बेवारस पार्किंगच्या गाडय़ांमुळे अन्य वाहनांना अडचण होत असते. वाहतूक पोलिसांनी या प्रकारात लक्ष घालावे व रस्ता सुरळीत करावा, अशी मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे.
पर्वरीतील प्रमुख रस्ता
पर्वरी हे मोठे शहर असल्याने अनेक वसाहती या भागात आहे. पण अनेक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडले आहते. चोगम रस्ता हा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावर शेकडो वाहनांची सतत वर्दळ असते. या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे. हा रस्ता पूर्ण खराब झाला आहे.









