प्रतिनिधी/ बेळगाव
दरवषी या उत्सवात फटाक्मयांच्या आतषबाजीमुळे शेकडो लोकांना त्यांची दृष्टी गमवावी लागते आणि कायमचे अंधत्व येते. फटाक्मयांमुळे लहान मुले, गरोदर महिला, वयोवृद्ध यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. स्फोटक फटाके तणाव, निद्रानाश, बहिरेपणा, उच्च रक्तदाब व हृदयविकाराचा झटका यासारख्या रोगांशी संबंधीत आहे. दिवाळी सणात मोठय़ाप्रमाणात फटाके फोडले जातात. पण त्यामुळे देशभरात शंभराहून अधिक जणांना आपले डोळे गमवावे लागतात. त्यासाठी आपण फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे मत पर्यावरणपेमी रामनाथ नायक यांनी क्यक्त केले.
महांतेशनगर येथील सोनवालकर हायस्कूलमध्ये कर्नाटक राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ, कर्नाटक विज्ञान परिषद आणि विविध प्रदुषण नियंत्रण मंडळांच्यावतीने आयोजित पर्यावरणपूरक दिवाळी उत्सवाबाबत जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रा. मा. नी. मंडळाच्या उपपर्यावरण अधिकारी राजश्री कोळ्ळी यांनी सांगितले की, रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत फटाके फोडू नये, असे त्यांनी सांगितले. बेळगाव असोसिएशन फॉर सायन्स एज्युकेशनचे सचिव के. बी. हिरेमठ यांनी आपले मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी एच. एन. सोनावलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एम. बदूरा उपस्थित होते. यावेळी विज्ञान केंद्राचे प्रकल्प सहाय्यक राजशेखर पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले. करमणी मंडळाचे वैज्ञानिक अधिकारी डॉ. जी. एम. पाटील यांनी आभार मानले.









