कर्मचाऱयांतून समाधान : परिवहनला राज्य सरकारची मदत
प्रतिनिधी / बेळगाव
परिवहन मंडळाच्या कर्मचाऱयांना अखेर ऑक्टोबर महिन्याचे वेतन मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. कोरोनामुळे परिवहनची बससेवा कोलमडली होती. याचा परिणाम कर्मचाऱयांच्या वेतनावर झाला आहे. दरम्यान, परिवहनच्या कर्मचाऱयांना ऑक्टोबर महिन्याच्या वेतनापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळे कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, नुकताच परिवहनच्या कर्मचाऱयांचे वेतन अदा करण्यात आल्याने कर्मचाऱयांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे परिवहनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने परिवहनच्या तिजोरीत ठणठणाट निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना वेळेत वेतन देणे अशक्मय झाले आहे. परिणामी कर्मचाऱयांची यंदाची दिवाळीही अंधारातच गेली आहे. कर्मचाऱयांना वेतन देण्यासाठी आर्थिक परिस्थिती मजबूत नसल्याने परिवहनने राज्य सरकारकडे मदत मागितली होती. राज्य सरकारने परिवहन कर्मचाऱयांच्या थकीत वेतनासाठी 75 टक्के मदत केली होती. ऐन अडचणीच्या वेळेला परिवहनच्या मदतीला राज्य सरकार धावून आल्याने कर्मचाऱयांचे वेतन झाले आहे.
नोव्हेंबर संपत आला तरी परिवहनच्या कर्मचाऱयांचे वेतन झाले नव्हते. त्यामुळे ऑक्टोबरचे वेतन कधी होणार या विवंचनेत कर्मचारी होते. मात्र, परिवहनने चालक-वाहक, तांत्रिक कर्मचाऱयांसह सर्व कर्मचाऱयांचे ऑक्टोबरचे वेतन दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱयांतून समाधान क्यक्त होत आहे.









