इस्लामपूर : प्रतिनिधी
जमीन परस्पर खरेदी, विक्री गैरव्यवहारातील परागंदा संशयित आरोपीला तीन वर्षांनी इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. संजय रामचंद्र घाडगे ( वय ४२ रा. घाडगे मळा,दहयारी ता.पलुस ) असे संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पाच डिसेंबर पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
इस्लामपूर येथील कचरे गल्लीत मूळ राहणारे परंतु मुंबई येथे स्थायिक असलेले श्रीकांत कृष्णा डांगे (वय ६५ वर्ष) यांची जमीन परस्पर ७८ लाख ८०हजार रुपयांच्या खरेदी, विक्रीचे गैरव्यवहारात फसवणुकीचे गुन्हयातील आरोपी संजय घाडगे हा सुमारे ३ वर्षापासुन परागंदा झाला होता. त्याचा शोध इस्लामपूर पोलीस ठाणेचे पथक सुमारे ३ वर्षापासुन घेत होते. सदरचा परागंदा आरोपी संजय रामचंद्र घाडगे हा त्याचे घरी येणार असल्याबाबत गोपनियरित्या माहीती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे व पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली संजय घाडगे याला घाडगे मळा येथे त्याच्या घराजवळ डी.बी.पथकाचे सपोनि.पी.पी. साळुंखे,अरुण पाटील ,शरद जाधव, प्रशांत देसाई, आलमगीर लतीप ,अमोल सांवत , सुमित शिंदे ,रोहिणी मोहिते यांच्या पथकाने सापळा लावून अटक केली.
Previous Articleजोतिबावर महिलेच्या १६ तोळे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
Next Article जिल्हय़ात आणखी 19 पॉझिटिव्ह








