ऑनलाईन टीम/मिरज
परदेशातून मिरजेत मुळगांवी परतलेल्या समतानगर येथील एका तरुणीला कोरोना झाल्याची अफवा सोशल मिडीयावर पसरवून तिची बदनामी केल्याप्रकरणी पोलिसात अज्ञात विरोधात तक्रार दाखल झाली आहे.
समातानगर येथील एक तरुणी सौदी अरबियात कतार देशात नोकरीस आहे. ती काही दिवसांपूर्वीच मिरजेत परतली होती. तरुणी मिरजेत सदर तरुणीला कोणताही आजार नसून तिचा होम क्वारंटाइनचा कालावधीही 19 मार्च रोजीच संपला आहे. असे असतानाही तिला कोरोना झाल्याची अफवा काहींनी सोशल मिडीयावर पसरविली होती. त्यामुळे सदर तरुणी आणि तिच्या कुटुंबियांना गेली आठवडाभर मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागत आहे. तिच्या कुटुंबियांना किराणा माल, भाजी, दूध अशा अत्यावश्यक सुविधाही देण्यास टाळाटाळ होत आहे. सदर तरुणीही पूर्णपणे निरोगी आहे. मात्र, तरीही काही समाजकंटकांनी परदेशावरुन आलेल्या यादीतील तिच्या नावाला गोल करुन तसेच फेसबुकवरुन तिचा फोटो करुन तो सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. याप्रकरणी सदर तरुणीने पोलिसात तक्रार दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








