प्रतिनिधी / चुये
यंदाच्या खरीप हंगाम मध्ये विविध पिकांच्या वाढीसाठी आणि परिपक्वतेसाठी उत्तम प्रकारचे प्रजन्यमान लाभल्याने भात सोयाबीन भुईमूग ही पिके जोमदार आली होती. त्यामुळे यंदाची सुगी भरमसाठ उत्पन्न असेल असे वातावरण शेतकरी वर्गात होते. मात्र पिकांची काढणी सुरू असताना पंधरा दिवसाच्या अंतराने परतीच्या पावसाने करवीर तालुक्यात धुमाकूळ घातला त्यामुळे त्यामुळे हातातोंडाशी आलेलं सोयाबीन भात ही पिके मुसळधार पावसाने भुईसपाट झाली सर्व तालुक्यात पाहायला मिळत आहे.
प्रत्येक वर्षी खरिपाच्या अंतिम कालावधीत हादगा नक्षत्रामध्ये परतीचा पाऊस कमी – जास्त प्रमाणात कोसळतो त्यामुळे परी पक्वतेच्या अवस्थेत अपूर्ण असलेल्या विविध पिकांना दिलासा मिळतो उशिरा कालावधी असणारी विविध प्रकारच्या भात पिकांना परतीचा पाऊस आधार ठरलेला असतो मात्र यंदाचा परतीचा पाऊस बळीराजाला नुकसानीचा ठरलेला आहे.
ऐन सुगीच्या तोंडावरच सलग चार दिवस करवीर तालुक्यात मुसळधार पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्यामुळे सुगीवर पाणी फिरल्याचे चित्र शिवारात पाहायला मिळत आहे. काढण्यासाठी आलेल्या भात पिकात पाणी तुंबल्यामुळे भात कापणीची कामे ठप्प झालेले आहेत. तसेच वादळी वाऱ्यामुळे उभी असलेली जोमदार भात पिके कोसळून पडलेली आहेत.
सुका चारा कुजला
खरीप हंगामातील भात पिकांची सोयाबीन पिकांची सर्वत्र काढण्याची धांदल सुरू असतानाच परतीच्या पावसाने सलग चार दिवस हजेरी लावल्यामुळे भात पिकापासून जनावरांना मिळणारा सुका चारा पिंजर व सोयाबीनचा पालापाचोळा परतीच्या पावसाने अक्षरशा शिवारातच कुजला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढल्या वर्षीपर्यंत आधार देणारा सुका चारा परतीच्या पावसाने हिरावून घेतलेला आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले
खरीप हंगामात घेतलेल्या विविध पिकासाठी शेतकऱ्यांनी प्रसंगी कर्ज काढून मशागतीपासून पिकांच्या काढणीपर्यंत विविध प्रकारचा खर्च करून पिके जोमदार वाढवली होती. मात्र उत्तम मिळण्याच्या वेळेसच परतीच्या पावसाची नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात गेलेला आहे. सलग चार दिवस पावसाने ठाण मांडल्याने शिवारात आडवी झालेली भात पिके पाहण्याची दुर्दैवी वेळ बळीराजावर आली आहे. भात व सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झालेला आहे. पीकासासाठी केलेली गुंतवणूक वाया जाणार आणि अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाल्याने बळीराजाचे यंदाचे उत्पन्नाचे आर्थिक गणित निश्चितच कोलमडलेली आहे.
ऊस पिकांना दिलासा
वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढत गेल्याने ऊस पिकांना पाण्याची नितांत गरज होती माळ भागातील ऊस पिके कोमललेली होती त्यामुळे ऊस पिकातील आंतरमशागतीची कामे ठप्प झाली होती. मात्र परतीच्या पावसाने ऊस पिके चिंब केली. त्यामुळे परतीचा पाऊस इतर पिकांना मारक ठरला तरी ऊस पिकाल मात्र दिलासा देणारा ठरलेला आहे. आडसाली हंगामामध्ये केलेल्या उसाच्या लागवडीला हा पाऊस तालुक्याच्या पश्चिम भागात पोषक ठरलेला आहे.
कापणी मळणी ठप्प झाली.
आठवड्यापूर्वी कोसळलेल्या पावसाने काहीशी विश्रांती दिल्याने शेतकरी वर्गाने भात व सोयाबीनच्या कापणीच्या कामाला वेग दिला होता. मात्र परतीच्या पावसाच्या सरीने हजेरी लावली अन् कापणी मळनीच्या सुगीला ब्रेक लावल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









