वारणानगर / प्रतिनिधी
देवाळे ता पन्हाळा येथे २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सतिश सुरेश डाकवे असे मृत तरुणाचे नाव आहे. चावऱ्याची खडी नावाच्या शेतातील जनावराच्या शेडमध्ये त्याने दोरीने गळफास घेतला. गुरुवार दि. ४ रोजी उशिरा ही घटना घडली.
याबाबतची श्रीपती हरी डाकवे यांनी कोडोली पोलिसात माहिती दिली आहे. आत्महत्याचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून अधिक तपास हावलदार चिले करीत आहेत.
Previous Articleमुंबईत भाजपला धक्का; कृष्णा हेगडे शिवसेनेत
Next Article कोल्हापूर जिल्ह्यात सक्रीय रूग्णसंख्या शंभरीपार









