वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली ता. पन्हाळा येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सतिश सुभाष जाधव वय ३६ रा.चव्हाण गल्ली असे तरुणाचे नाव आहे. सतिशने अंबीलटेक येथील शेतात गळफास लावून आत्महत्या केली.
शेतातील शेडमध्ये सतिश हा मुक्कामाला होता सकाळी नातेवाईक गेलेवर हा प्रकार लक्षात आलेवर तातडीने त्यास कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारास आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी तो मृत असल्याचे घोषीत करून याबाबत कोडोली पोलिसात वर्दी दिली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही अधिक तपास कोडोली पोलीस करीत आहेत.
……………………………..
देवाळे येथे तरुणीची आत्महत्या
देवाळे (ता.पन्हाळा) येथे एका तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. दिपाली आनंदा मदने वय १८ असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे. या बाबतची वर्दी दिलीप आनंदा मदने याने कोडोली पोलिसात दिली आहे कोडोली पोलीस तपास करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









