क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
पदवीपूर्व शिक्षण खाते व सरकारी सरस्वती पदवीपूर्व महाविद्यालय शहापूर आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडली. मुलींचे स्पोर्ट्स हॉस्टेल कोल्हापूर सर्कलच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कराटे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पदवीपूर्व खात्याचे उपसंचालक नागराज व्ही., सरस्वती पदवीपूर्व महाविद्यालयाचे बी. वाय. हुन्नूर, प्रभू शिवनायकर, जी. एन. पाटील, जितेंद्र काकतीकर, डॉ. अमित जडे, रमेश अलगुडगेकर आदी उपस्थित होते. स्पर्धेत एकूण 100 हून अधिक कराटेपटूंनी भाग घेतला.
गजेंद्र काकतीकर, विठ्ठल बोगार, प्रभाकर किल्लेकर, निलेश गुरखा, परशराम काकती, हर्ष सोनार, नताशा अष्टेकर, विनय धामणेकर, अक्षय परमोजी यांनी पंचाची भूमिका बजावली.









