पेडणे अबकारी कार्यालयाची कारवाई
पेडणे (प्रतिनिधी )
पत्रादेवी चेकनाक्मयावर बेकायदा चोरटी दारू वाहतूक करणाऱया वाहनासह 7 लाख 21 हजारांची दारू जप्त केली. पेडणे अबकारी विभागाची एका महिन्याच्या कालावधीत ही तिसरी कारवाई असून एकूण 32 लाख रुपयांपेक्षा जास्त चोरटी दारू पकडण्याची धडक कारवाई केली आहे .
शनिवारी 10 रोजी म्हापसामार्गे मिरज पहाटे साडेतीन वाजता जाणारे वाहन एम एच 48 ए व्हाय 5916 हे पत्रादेवी चेकनाक्मयावर आले असता वाहन चालकाने चेकनाक्मयावर दाखवले व घरगुती सामान असल्याचे सांगितले. अबकारी अधिकाऱयांना याचा संशय आला. त्यावेळी अबकारी अधिकाऱयांनी पाहणी केली असता आता घरगुती सामनाबरोबर 249 बॉक्सेस यात मेक्डॉल, रॉयल चॅलेंज या दारुच्या बाटल्या होत्या. बाजारात त्याची किंमत 7 लाख 21 हजार एवढी भरते . ही कारवाई करत असतानाच वाहन चालक घटनास्थळापासून पळून गेला.
ही कारवाई अबकारी अधिकारी मोहनदास गोवेकर, विभूती शेटय़े, अमोल हरळेकर, शांबा परब , सिद्धेश हळदणकर , स्वप्नेश नाईक व सूरज गावडे आदींनी ही कारवाई केली .
अबकारी विभागाने 8 व 23 सप्टेंबर रोजी अनुक्रमे 8 व 17 लाखाची दारू जप्त केली होती ही तिसरी कारवाई असून 10 रोजी 7 लाख 21 हजारांची दारू पकडण्यास अबकारी खात्याला यश मिळाले .









