प्रतिनिधी / बेळगाव :
लॉकडाऊनची झळ प्रसारमाध्यमांनाही बसली आहे. परंतु याच काळात पत्रकारही आपले काम चोख पार पाडत आहेत. याची दखल भरतेश शिक्षण संस्थेने घेऊन पत्रकारांनाही मदत केली हे महत्त्वाचे, असे मत माजी महापौर विजय मोरे यांनी व्यक्त केले.
भरतेश शिक्षण संस्थेने लॉकडाऊनमधील वेगवेगळय़ा घटकांना रेशनचे किट देत मदत केली आहे. याच संस्थेने पत्रकारांनाही 30 किट वितरित केले आहेत. पत्रकार विकास अकादमीच्या माध्यमातून गरजू पत्रकारांना हे किट देण्यात येत आहेत. मंगळवारी पत्रकार विकास अकादमीचे उपसचिव प्रकाश बिळगोजी यांच्याकडे हे किट सुपूर्द करण्यात आले.
या प्रसंगी भरतेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पी. पी. दोड्डण्णावर, डॉ. जिनदत्त देसाई, श्रीपाल खेमलापुरे, विनोद दोड्डण्णावर, बी. एस. चौगुले यांच्यासह संतोष ममदापूर, ऍलन मोरे उपस्थित होते.









