मुंबई
पतंजली फूडस्चे समभाग पुन्हा एकदा आता तेजीच्या दिशेने सरकताना दिसत आहेत. सोमवारी समभागामध्ये 10 टक्के इतकी वाढ होत समभाग 949 रुपयांवर पोहोचला होता. गेले काही दिवस पतंजलीचे समभाग सततपणे घसरणीत राहिलेले होते. गुंतवणूकदार या घसरणीमुळे निराशेत होते. यापूर्वी 24 जानेवारी 2023 ला कंपनीचा समभाग 1215 रुपयांवर उच्चांकी कार्यरत होता. गेल्या आठ सत्रांमध्ये कंपनीचे समभाग 30 टक्क्यांपर्यंत घसरले होते.









