कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष शिवाजीराव घुले यांना अमेरिकेतील दि इंटरनॅशनल युनिवर्सिटी, वॉशिंग्टनची डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील केळी या पिकाची पणन व्यवस्था या विषयावर प्रबंध सादर केला आहे.
कोल्हापूर विभागात काम करताना विविध शेतमालाच्या पणन संबंधी अडचणी माहीत असल्याने त्याचा निश्चित उपयोग झाला आहे. तसेच यापुढे सुद्धा डॉक्टरेट पदवीचा शेतमालाच्या पणन व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी निश्चित उपयोग होणार असल्याचे डॉ. घुले यांनी नमूद केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









