ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसमधील काही नेत्यांकडून बंड तीव्र केले जात आहे. पक्षाचे अनेक नेते ममता बॅनर्जींना लक्ष्य करत आहेत. सतत पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नेते कनिष्क पांडा यांना आज पक्षातून निलंबित करण्यात आले.
बंगालच्या २९४ सदस्यांच्या विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. उपनिवडणूक आयुक्त सुदीप जैन १७ डिसेंबरला राज्याचा दौरा करून पुढील वर्षी होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात जैन विरोधी पक्षांच्या तक्रारींचीही चौकशी करणार आहेेत.









