निवळी बावनदी येथे पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी येथे पुन्हा एकादा मांडूळ जातीच्या सापाची तस्करी होत असल्याची घटना समोर आली आह़े शुक्रवारी रात्री निवळी बावनदी येथे 15 लाखाच्या मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱया तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आल़े स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्यावतीने ही कारवाई करण्यात आल़ी पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास करण्यात येत आह़े
सतीश युवराज मंडळे (ऱा सांगली), सुरेश सुनील भोसले, महादेव लोंढे (दोन्ही ऱा सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़ याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मांडूळ सापाची तस्करी होणार असल्याची गूप्त बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला प्राप्त झाली होत़ी त्यानुसार या टोळीला जेरबंद करण्यासाठी पोलिसांकडून सापळा रचण्यात आल़ा
यातील तिनही संशयित मुंबई-गोवा महामार्गाने जाणार असल्याने त्यानुसार निवळी बावनदी येथे पोलीस सावज येण्याची वाट पाहत होत़े शुकवारी रात्री 9 च्या सुमारास संशयित आरोपीत हे बोलेरो गाडी (एमएच 50 ए 450) मधून निवळी बावनदी येथ आल़े यावेळी दबा धरून बसलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱयांनी अचानक झडप घालून संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्य़ा
संशयितांकडे पोलिसांना 15 लाख रूपये किमतीचा मांडूळ जातीचा साप आढळून आला आह़े दरम्यान संशयित आरोपी हे जिह्याबाहेरील आहेत़ त्यांनी हा साप रत्नागिरी येथून हस्तगत केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े दरम्यान तस्करीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आणखी संशयितांचा शोध घेतला जात आह़े
काही महिन्यांपूर्वी रत्नागरी शहरालगतच्या काजरघाटी येथे मांडूळ जातीचा साप व खवले मांजर तस्करी करणाऱया संशयितांना ताब्यात घेण्यात आले होत़े रत्नागिरी जिह्यातील वन्यजीव संपदा मोठय़ा प्रमाणावर असल्याने त्याला बाहेरील देशामध्ये कोटय़ावधी रूपयांना या प्राण्याची विक्री केली जात़े त्यासाठी स्थानिकांना हाताशी धरून या वन्यजीवांना पकडून तस्करी केली जात असल्याचे समोर आले आह़े









