प्रतिनिधी / वारणानगर
शासनाकडून उपलष्य होणाऱ्या पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून होणाऱ्या कामासाठी विकास आराखडा सादर करण्याचे आवाहन पन्हाळा पंचायत समितीचे ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी तथा प्रशिक्षक राजेद्र तळपे यानी केले.
कोडोली ता.पन्हाळा येथील सर्वोदय सभागृहात कोडोली जिल्हा परिषद मतदार संघातील कोडोली, केखले, पोखले, जाखले, बहिरेवाडी या गावच्या सरपंच, सदस्य,अंगणवाडी,सेविका, मदतनीस,आशा वर्कर, तसेच शासन इतर विभागातील प्रतिनिधीची पंधराव्या वित्त आयोगातील विकास कामांचा आराखडा निर्माण करण्यासाठी एकदिवशीय कार्यशाळा कोडोली हौसिंग सोसायटीचे चेअरमन व माजी उपसरपंच मानसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
गावाला मिळणाऱ्या पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून स्वच्छता व हंगणदारी मुक्त गावातील देखभाल दुरुस्ती, नळ पाणी पुरवठा, शुध्द पाणी पुरवठा करणे, पाणी आडवा, पाणी जिरवा,शिक्षण,आरोग्य, उपजिविका,महिला, बालकल्याण, लोकसंखेच्या प्रमाणात मागासवर्गीय क्षेत्रासाठी तसेच इतर कामासाठी निधी कसा खर्च करावा त्याचे अंदाज पत्रक व आराखडा कसा तयार करावा याचे प्रशिक्षण राजेद्र तळपे व कृषी विभागाचे विस्तार अधिकारी एन. के. पाटील यानी दिले. कोडोलीचे ग्रामविकास अधिकारी ए.वाय. कदम यानी प्रास्ताविक करून अभार मानले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









