ऑनलाईन टीम / चंदीगड :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच गुरुवारी पंजाबमध्ये कोरोनामूळे 7 जणांचा मृत्यू झाला. राज्यात मागील दोन दिवसात 15 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 120 इतकी झाली आहे. तर मागील 24 तासात 142 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकुण संख्या 4769 वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यातील 2,69,037 जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. सध्या 1457 रुग्ण विविध रुग्णालयातील आयासोलेशन वॉर्डमध्ये दाखल आहेत. यातील अमृतसर मधील 3, जालंधर 2, पठाणकोट आणि पटियालातील प्रत्येकी एक असे एकूण 25 रुग्ण ऑक्सीजन सपोर्टवर तर 5 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
गुरुवारी 92 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत पंजाबमधील एकूण 3192 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.









