ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पंजाबमध्ये मागील 24 तासात 2 हजार 526 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 63 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 74 हजार 616 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण 74,616 रुग्णांपैकी 53 हजार 308 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 212 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 13 लाख 32 हजार 564 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 19 हजार 096 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 529 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 79 जण व्हेंटिलेटरवर आहेत.









