चंदीगढ –
पंजाबमध्ये गहू खरेदी 10 एप्रिलपासून सुरु होणार आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आहे. चालू सत्राच्या दरम्यान खरेदी एजन्सीज सोबत तसेच एफसीआय 1,975 रुपये प्रति क्विंटलच्या मूल्यावर आधारीत खरेदी होण्याची शक्यता आहे. राज्याच्या कृषी आणि किसान कल्याण विभागाने राज्यातील मार्केटमध्ये 130 लाख टन गव्हाची आवक राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे पंजाब सरकारने एक एप्रिलच्या ऐवजी 10 एप्रिल रोजी खरेदी सत्र सुरु करण्याचा निर्णय घेतलेला असल्याची माहिती आहे.









