कुरुंदवाड प्रतिनिधी
पंचगंगा नदी प्रदूषण बाबत गेल्या काही वर्षापासून आंदोलन करत असलेल्या सामाजिक कार्यकर्ते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळे शासन स्तरावर याची दखल घेऊन आज प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर महापालिका व शिवाजी विद्यापीठ यांच्या अधिकाऱ्यांनी तेरवाड बंधारा येथे पंचगंगेच्या शुद्धतेबाबत पाचव्यांदा पाण्याचे नमुने घेतले.
सामाजिक कार्यकर्ते व स्वाभिमान शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी पंचगंगा प्रदूषण प्रश्नाबाबत वारंवार विविध आंदोलने केली होती. यामध्ये अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजणे मृत माशाचा हार घालने अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणे केंदळे अंगावर टाकणे, आदी विविध प्रकारची आंदोलने केली होती याची दखल घेत शासनाने पंचगंगा प्रदूषणाबाबत एक कृती आराखडा तयार केला याअंतर्गत यापूर्वी चारवेळा पंचगंगा नदीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. मात्र कोणतीही कृती करण्यात न आल्याने आंदोलन करते विश्वास बालीघाटे बंडू पाटील योगेश जिवाजी बंडू उमडाळे आदींनी पुन्हा एकदा जिल्हाधिकार्यांना याबाबत कळवले असता आज दुपारी तेरवाड बंधारा येथे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सचिन हरबड कोल्हापूर महापालिकेचे केवल लोट शिवाजी विद्यापीठाचे फील्ड असिस्टंट अजय गौड यांनी तात्काळ भेट देऊन येथील पाण्याचे पाचव्यांदा नमुने घेतले.
यावेळी सर्व आंदोलन करते उपस्थित होते त्यांनी या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत सध्या पाणी चांगले आहे. मात्र पंचगंगेच्या काठावरील कोणत्याही कारखान्यांना ईटीपी प्लांट बसल्याशिवाय परवानगी देऊ नये अन्यथा पुन्हा आम्ही आंदोलनाचे अस्त्र बाहेर काढू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. याबाबत एका अधिकाऱ्याने इचलकंजी येथील एक प्रोसेस सुरू होते त्यांचा ईटीपी प्लांट नसल्यामुळे त्यांना ताबडतोब बंद करण्यास सांगून त्यांच्यावर कारवाई केल्याचे नमूद केले.
दरम्यान सध्या लॉक डाऊन सुरू असल्यामुळे पंचगंगा नदी बरेपैकी प्रदूषण मुक्त झाले आहे. तरीही काही प्रमाणात शेवाळ सांडपाणी येथे मिसळत आहे यावरही ताबडतोब नियंत्रण ठेवावे अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
Previous Articleजिल्ह्यातील २०० खेळाडू घेतायेत तायक्वांदोचे ऑनलाईन धडे
Next Article सोलापुरात नव्याने सात कोरोना बाधित रुग्णांची भर








