सांगली : प्रतिनिधी
भाजपने सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रभारीपदी माजी मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती केली आहे. पंकजाताईनी आज सांगलीत भेट दिली.कार्यकर्त्यांशी संवाद केला आणि लोकहिताच्या प्रश्नावर संघर्ष करु असे सांगितले यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, नीता केळकर, दीपकबाबा शिंदे, प्रकाश बिरजे यांनी त्यांचे स्वागत केले. भाजप नेटाने वाढवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.