ख्राइस्टचर्च
न्यूझीलंडच्या संसदीय निवडणुकीत निवडून आलेल्या आणि आता मंत्री झालेल्या भारतीय वंशाच्या प्रियांका राधाकृष्णन यांनी तेथील संसदेत मल्याळम भाषेत भाषण करून इतिहास घडवला आहे. प्रियांका या दोनवेळा संसदेत निवडून आल्या असून त्या न्यूझीलंडच्या संसदेत निवडल्या गेलेल्या प्रथम भारतीय आहेत. त्या या देशाच्या कामगार पक्षाच्या 14 वर्षांपासून सदस्या आहेत. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या फिरत असून तो 2017 चा असल्याचे सांगण्यात येते. हा व्हिडीओ केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी शेअर केल्याने तो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला.