बेनोनी / वृत्तसंस्था
ख्रिस्तियन क्लार्कच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर न्यूझीलंड युवा संघाने विंडीज युवा संघाला धूळ चारली व यू-19 आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. क्लार्कने प्रारंभी गोलंदाजीत 25 धावात 4 बळी घेतले व यामुळे न्यूझीलंडने विंडीजला 238 धावांवर रोखले तर प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 49.4 षटकात 8 बाद 239 धावांसह विजय संपादन केला. क्लार्कने यात 42 चेंडूत 46 धावांचे योगदान दिले.









