प्रतिनिधी / बेळगाव
नेहरुनगर देवराज अर्स कार्यालयाच्या शेजारी मनपाच्या जागेत सुरू असलेल्या इंदिरा कॅन्टीन आणि अंगणवाडीजवळ अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे.
याच ठिकाणाहून बेळगावमधील सर्व इंदिरा कॅन्टीनना साहित्य पुरवठा करण्यात येतो. परंतु सध्या येथील उघडय़ावर असलेल्या गटारीत शिल्लक राहिलेले अन्न टाकल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यातच डेनेजचे सांडपाणीही मिसळत आहे.
सध्या स्वच्छता राखणे आवश्यक असून या भागाकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. इंदिरा कॅन्टीनची गरज लक्षात घेऊन कॅन्टीनचा परिसर स्वच्छ राखणे आवश्यक असल्याने तातडीने स्वच्छता करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.