नवी दिल्ली
देशात इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी सादर केल्या जात असताना आता इलेक्ट्रिक सायकलही बाजारात आणण्याचे पर्व सुरू झाले आहे. नेक्झू मोबिलिटी यांनी बजिंगा नावाने नवी इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणली आहे. ती एकदा चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटर अंतर कापेल. या सायकलमधील बॅटरी वेगळी काढून घरात चार्ज करता येण्याची सुविधाही उपलब्ध आहे.









