अमेरिकेच्या तपास यंत्रणा सक्रीय
न्यूयॉर्क
अमेरिकेच्या नॅशविलेमध्ये शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटाचे कोडं अद्याप सुटलेले नाही. हा दहशतवादी हल्ला आहे का दुर्घटना हे देखील स्पष्ट झालेले नाही. तर तपासयंत्रणांना घटनास्थळी मानवी शरीराचे काही तुकडे मिळाले आहेत.
नॅशविलेमध्ये शुक्रवारी सकाळी सुमारे साडेसहा वाजता भीषण स्फोट झाला होता. स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला आणि टेनेसीमध्ये कित्येक इमारतींना नुकसान पोहोचले आहे. पोलीस आणि एफबीआय या स्फोटाचा दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीकोनातून तपास करत आहेत. पथकाला घटनास्थळावरून काही तुकडे मिळाले आहेत. हे तुकडे प्रयोगशाळेत अधिक तपासणीसाठी पाठविण्यात असल्याचे नॅशविले पोलीस प्रमुख जॉन डेरेक यांनी सांगितले आहे.









