विलगीकरण कक्षात दाखल : सावंतवाडी, मालवणचे रहिवासी : कुटुंबियांना केले होम क्वारंटाईन
- विलगीकरण कक्षात नव्याने सहा रुग्ण दाखल
- विलगीकरण कक्षात आता एकूण 26 रुग्ण
- एकूण 49 रुग्णांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
- पॉझिटिव्ह रुग्णाच्या नमुना तपासणी अहवालाची प्रतीक्षा
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरात झालेल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ातील दोन व्यक्ती सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने या दोन्ही व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल केले आहे. यातील एक व्यक्ती सावंतवाडी येथील, तर दुसरी मालवण येथील आहे. या व्यक्तींची नावे राज्यस्तरावर प्राप्त झालेल्या यादीमध्ये नव्हती. या दोन्ही व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या दोन व्यक्तींच्या कुटुंबियांचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये नव्याने सहा रुग्ण दाखल झाले असून एकूण 26 रुग्ण उपचार घेत आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या एका रुग्णासह सहा रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे.
सहा नमुन्यांचा अहवाल येणे बाकी
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये गुरुवारी 26 रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत एकूण 56 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 50 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये 49 नमुने हे निगेटिव्ह आहेत. तर सहा नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. ज्या व्यक्तीचा अहवाल कोवीड-19 पॉझिटीव्ह आला होता, त्याचा दुसरा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला नव्हता. सध्या जिल्हय़ात 366 व्यक्तींना घरीच विलगीकरण करण्यात आले असून संस्थात्मक विलगीकरणामध्ये 81 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत गुरुवारी दिवसभरात 1158 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
नागरिकांच्या आरोग्याची माहिती जमा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने https://sossindhudurg.in ही लिंक तयार केली असून त्यामध्ये नागरिकांनी स्वतःची संपूर्ण माहिती स्वतःहून भरायची आहे. तसेच एखाद्या डॉक्टरना पेशंटसंबंधी काही माहिती द्यायची असेल, तर तीही या लिंकच्या माध्यमातून देता येणार आहे. त्यासाठी क्मयूआर कोडची सुविधाही उपलब्ध आहे. जिल्हय़ातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घेऊन या लिंकच्या माध्यमातून आरोग्याची माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मजूर, बेघरांसाठी जिल्हाभरात 14 कॅम्प
परराज्यातील मजूर, बेघर तसेच कामगार यांच्यासाठी जिल्हय़ात एकूण 14 कॅम्प उभारण्यात आले असून त्यामध्ये आजमितीस 527 एवढे लोक राहत आहेत. या सर्वांच्या जेवणाची सोय शिवभोजनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या मजूर व बेघर कॅम्पसाठी कोणास वस्तू स्वरुपात मदत करायची असल्यास त्यांनी विक्रम बहुरे (9518950903) किंवा अशोक पोळ (9766144041) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हय़ामध्ये संचारबंदीचा आदेश भंग केल्याबद्दल 35 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून एकूण 31 दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
ज्ये÷ नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक
ज्ये÷ नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. ज्ये÷ नागरिकांना शिधा, औषध, आरोग्य या संबंधी काही समस्या असल्यास तसेच काही आवश्यकता असल्यास त्यांनी 02362-228869 या हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. सदर हेल्पलाईन क्रमांक हा 24 तास कार्यरत असणार आहे.
विलगीकरण केलेल्यांचे समुपदेशन जिल्हय़ात विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलेल्या व्यक्तींचे समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच मजूर व बेघर कॅम्पमध्ये अडकलेल्या लोकांचेही समुपदेश करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हय़ातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत सहा समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. समुपदेशनासाठी नमिता परब (7887366603), अर्पिता वाटके (7385250501) या सावंतवाडीसाठी, समृद्धी मळेकर (9326298748), नम्रता नेवगी (9527911350) हे कुडाळसाठी, तर कणकवलीसाठी रिया सांगेलकर (9420969702) आणि रोजा खडपकर (9765321297) या प्रमाणे नेमणूक करण्यात आली आहे. �.









