मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन; नायगावात सावित्रीबाई फुले जयंती
प्रतिनिधी/ खंडाळा
नायगाव हे एक ऊर्जा केंद्र असून विकासात्मक कामे निश्चित पूर्ण करू. फुले दाम्पत्यांचे विचार समाजात पोहोचवित असताना महाराष्ट्रात चांगले काम करणाऱया महिलांना 3 जानेवारीला पुरस्कार देवून सन्मान करावा, असे प्रतिपादन ना. छगन भुजबळ यांनी नायगाव येथे केले.
खंडाळा तालुक्यातील नायगांव येथे भारतातील आद्य स्त्राr शिक्षिका व स्त्राr शिक्षणाच्या जनक, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 189 व्या जयंती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मंत्री छगनराव भुजबळ, नामदार बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई यांनी फुले दाम्पत्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. स्मारकाची पाहणी केल्यानंतर सभास्थळी मान्यवर दाखल झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी नामदार छगनराव भुजबळ, माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, समता परिषदेचे अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, इतिहास संशोधक व अभ्यासक हरि नरके, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा परिषद सदस्य दिपाली साळुंखे, माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, खंडाळ्याचे सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती वंदनाताई धायगुडे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष दत्तानाना ढमाळ, प्रांतअधिकारी संगीता चौगुले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, गटशिक्षण गजानन आडे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले, बांधकामचे सुनिल हेळकर, सरपंच सुधीर नेवसे, उपसरपंच सीमा कांबळे, समता परिषद अध्यक्ष राजेंद्र नेवसे, आदेश जमदाडे, अजय भाळवनकर, अश्विनी कासार, नितीन वैद्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. भुजबळ म्हणाले, सावित्री माईंचे जन्मगाव हे पॉवर स्टेशन आहे. या ठिकाणी मी, सहकारी आणि शासन विकासकामे पूर्ण करण्यासाठी निश्चित प्रयत्न करु. त्यासाठी जिल्हा परिषदेनीही लक्ष द्यावे, अशा सूचना केल्या. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच नाव देशातच नाही, तर परदेशातही पोहचले आहे. दूरवरून या चेतना भूमीत लोक येतात. भेट देवून अभ्यासही करतात. सर्वांनी सावित्रीबाईं फुले यांचे विचार समाजात रुजवावेत. नायागावला विकास करताना मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करू.
आ. मकरंद पाटील म्हणाले, समाज परिवर्तनाची बीज फुले दाम्पत्यांनी रोवली. स्त्राr शिक्षण, अनिष्ठ रुढी, परंपरा यांचा सामना करत समाज बदलण्याच काम सावित्रीबाई फुलेंनी केले. त्यांच्या नावाला शोभेल असं काम आपण करू या.
यावेळी माजी आमदार शशिकांत शिंदे, राम शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, सभापती राजेंद्र तांबे, हरि नरके यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी नायगाव शाळेच्या विद्यार्थांनी स्वागत गीत गायले. प्रास्तविक सरपंच सुधीर नेवसे तर स्वागत, सूत्रसंचालन नितीन भरगुडे पाटील यांनी केले. शेवटी सर्व उपस्थितांचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी आभार मानले.









