प्रतिनिधी/ म्हापसा
जिल्हा पंचायत निवडणुकासाठी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलणी करणार आहोत. पक्षाची जी सिस्टम आहे त्यानुसार आम्ही जाणार असून उत्तर गोव्यात 25, दक्षिण गोव्यात 25 असे 50 उमेदवाराची यादी तयार केली जाईल. जिल्हा पंचायत निवडणुका पक्षपातळीवर घेण्यात येणार असून निवडणुकांची अधीसूचना आल्यावर आम्ही उमेदवारी यादी जाहीर करणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांना दिली. तत्पूर्वी जी चर्चा करायला पाहिजे ती उमेदवारांशी करूनच आम्ही पुढे जाणार असल्याचे ते म्हणाले.
म्हापसा भाजपा उत्तर गोवा म्हापसा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री तानावडे बोलत होते. ते म्हणाले की, पालिका निवडणूक आजपर्यंत कधीच पक्षपातळीवर केले नाही. त्यामुळे पालिका निवडणूक पूर्वी जशा व्हायच्या त्याच पद्धतीने होणार आहेत. पालिका निवडणूक पक्षपातळीवर होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. प्रमोद सावंतच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पुढे जाणार आहेत. असे त्यांनी सांगितले. म्हादई, खाण विषय सोडविण्यास आम्ही पाठिंबा देत देत आहोत. राज्यात जो नकायदा विषय चालला आहे उत्तर गोव्याचे अध्यक्ष महानंद अस्नोडकर आजपासून कामाला लागणार असून ते घरोघरी जाऊन याबाबत पत्रके वाटणार आहे. यासाठी जे विरोध करणारे आहे त्यांना हे समज येणार आहे. या संदर्भात सीएच्या संदर्भात जी रॅली झाली त्यासाठी 25 हजार कार्यकर्ते उपस्थित राहील. सर्व आमदार मंत्री यात सहभागी झाले होते.
अन्य कुणालाही भाजपात प्रवेश देणार नाही. सध्या सरकार चांगले चालले आहे. दिगंबर कामत बाबतही अफवा चालल्या आहेत. तसे काही नाही. भाजपात अन्य कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
थिवीत काहीही जुदाभाव नाही
राज्यात सर्वत्र मंडळ समित्या नेमण्याच्या कारणावरून थिवी व अन्य एका ठिकाणी समिती नेमण्याची बाकी आहे. ती समिती येत्या काही दिवसात काढण्यात येई&ल. तेथे अस्थिरता काही नाही. तेथे किरण कांदोळकर यवा निळकंठ हळर्णकर यांचा दावा आहे असे काही नाही. प्रत्येक पंचायत निवडणुका व विधानसभा यात खूप फरक आहे. येथे दोन गोष्टी आहे. थोडय़ा कालावधीसाठी पाहणे व पुढील पुढील दूरदृष्टीकोन ठेवून पाहणे. सर्वजण पक्षाबरोबर आहे. येथे काही दुजाभाव नाही असे प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी स्पष्ट केले.
आमदार मोन्सेरातवर नाहक भाष्य नको
आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यावर जली बलात्काराचे आरोप असले तरी ते अद्याप सिद्ध होणे बाकी आहे. आम्ही नाहक त्यावर भाष्य करणे योग्य नाही. असे असले तरी जनतेने त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. जनतेने त्यांना स्विकारले आहे. मग अशा प्रतिनिधीना आम्ही घेऊन पुढे गेले त्यात वाईट काय आहे. हा पक्ष सर्वांना सामावून बोरबरीने घेऊन जाणारा आहे. सामान्य नागरिकांची कळ त्यांना आहे म्हणून माझ्यासारखा सामान्य आज प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोचला असे श्री तानावडे म्हणाले. उत्पल पर्रीकरांना भाजपचा धुरा पुढे नेण्यासाठी पक्षात जोमाने काम करण्यास सांगणार काय? या प्रश्नावर ते म्हणाले, भाजपा हा पक्ष कुणाचा खासगी पक्ष नाही. हा पक्ष तळागाळात पोचविण्यासाठी स्व. पर्रीकरांनी मोठे कार्य केले आहे. या पक्षाचे वेगळेपण म्हणजे सर्वांना बरोबरीने घेऊन जाणे, काम करून पुढे जाणे हेच या कार्यकर्त्यांचे ध्येय आहे. या पक्षासाठी कुणीही काम करावे असे ते म्हणाले.
डॉ. प्रमोद सावंत व स्व. मुख्यमंत्री पर्रीकर यांचे नाते गुरु शिष्याचे
पंचायत पातळीवर ते प्रदेशाध्यक्षपद होईपर्यंत आपण राजकारण खूप जवळून पाहिले. स्व. मनोहर पर्राकर व आता डॉ. प्रमोद सावंत यांनाही मुख्यमंत्री म्हणून जवळून पाहत आहे. या दोघामध्ये आपल्याल काय फरक जाणवतो असा प्रश्न प्रदेशाध्यक्ष तानावडे यांना पत्रकारांनी केला असता ते म्हणाले की, स्व. मनोहर पर्रीकर ते मनोहर पर्रीकर त्यांची जागा अन्य कुणी घेऊ शकत नाही. प्रत्येकाची काम करण्याची शैली वेगळी आहे. राज्याचा धुरा त्यांनी डॉ. सावंतकडे दिला. सध्या मुख्यमंत्री डॉ. सावंत योग्यरित्या सांभाळत आहे. त्यांच्याबद्दल बोलणार काय. त्यांचे नाते गुरु शिष्याचे आहे आणि स्व. पर्रीकर म्हणजे पर्रीकर आहे. त्यांची तुलना कुणालाही लागणार नाही.









