पेडणे / (प्रतिनिधी)
नाटय़तरंग गोवा आयोजित कला व संस्कृती संचालनालय गोवा सरकार पणजी गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत संमेलन शनिवार दि. 25 व रविवार दि. 26 जानेवारी रोजी नाना शेठ सभागृह नागझर पेडणे येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती नाटय़तरंग संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या पेडणे येथे पञकार परिषदेत देण्यात आली.
पेडणे येथे घेण्यात आलेल्या पञकार परिषदेला संस्थेचे संस्थापक गोविंद मराठे, अध्यक्ष सर्वेश परब, उपाध्यक्ष नितिन परब, सचिव हेमंत केरकर व खजिनदार चंद्रशेखर गवस उपस्थित होते.
शनिवार दि. 25 जानेवारी रोजी सायंकाळी 4. वाजता सुदेश प्रभूदेसाई (गोवा) यांचे अभंग नाटय़गीत गायन, कुमारी नम्रता पराडकर (गोवा) यांचे अभंग नाटय़गीत गायन होणार आहे.
सायंकाळी 5 वाजता उद्घाटन कार्यक्रम
या कार्यक्रमाला मनोहर उर्फ बाबू आजगावकर (उपमुख्यमंत्री गोवा राज्य), विठ्ठल काका प्रभुदेसाई (नाटय़ कलाकार, अध्यक्ष संवादी संगीत संस्था धारगळ), तुळशीदास गावस भाजप, अध्यक्ष पेडणे मतदार संघ, सदस्य चांदेल-हसापुर पंचायत, प्रदीप पाडलोस्कर सरपंच-वारखंड नागझर (ग्रामपंचायत) गोविंद रामचंद्र मराठे (संस्थापक नाटय़रंग गोवा) आदी मान्यवर उद्घाटन सोहळय़ाला उपस्थित राहणार आहेत.
ड़ पेडणेतील ज्ये÷ कलाकाराचा सत्कार
पेडणे तालुक्मयातील नाटय़ तसेच संगीत क्षेत्रात योगदान दिलेल्या ज्ये÷ कलाकारांचा सत्कार प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यात ज्ये÷ रंगभुषाकार आणि नाटय़ कलाकार दिलीप मांदेकर, नाटय़ कलाकार नारायण परब, नाटय़ कलाकार महादेव शिरोडकर व नाटय़ कलाकार बुधाजी परब यांचा सत्कार होणार आहे.
सायंकाळी 5.30 वाजता दत्तराज म्हाळशी यांचे हार्मोनियम एकलवादन होणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता कुमारी सिद्धी बोंदे (रत्नागिरी) यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे.
ड़ रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
स्वर्गीय रामचंद्र गोविंद मराठे स्मरणार्थ सायं. 4 वा. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कीर्तनकार ह.भ प चारुदत्त आफळे बुवा (पुणे) यांचे वीर सावरकरांवर चरित्र कीर्तन ” देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो” स्वर्गीय सावरकर. त्यांना तबला साथ दयानंद कांदोळकर तर आ?र्गन साथ राया कोरगावकरकयणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन विभा वझे, ध्वनी संयोजन सिद्धेश नाईक, संवादिनीवर राया कोरगावकर तबला संकेत खलब, संवादिनीवर उद्देश पेडणेकर, तबला तुकाराम गोवेकर, ऑर्गन आनंद नाईक, तबला दयानंद कांदोळकर साथ करणार आहेत. या कार्यक्रमाला संगीत रसिक, नाटय़ रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाटय़तंरग गोवा संस्थेने केले आहे.









