ऑनलाईन टीम / भोपाळ
देशात दिवसेंदिवस महागाईचा भस्मासुर सामान्यांचे जगणे महाग करत असुन यामुळे सामान्यांचे अर्थिक गणित कोलमडले आहे. इंधन सारखा मुलभुत घटकाच्या किंमती वाढत आहेत. याच पार्श्वभुमीवर केंद्र सरकारवर विरोधी पक्ष आगपाखड करत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी महागाईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. त्यांनी वाढत्या महागाईची तुलना पंतप्रधान मोदींच्या दाढीशी केली आहे. ते मध्य प्रदेशात पोटनिवडणुक प्रचारावेळी ते बोलत होते.
यावेळी टीका करताना कमलनाथ म्हणाले, “जे दिल्लीत दाढी वाढवून बसले आहेत, पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की त्यांची दाढी एक इंच वाढते. महागाई एवढी वाढली आहे की, त्याचा परिणाम आता जनतेच्या ताटात दिसून येत आहे. लोकांच्या ताटातील पदार्थ कमी कमी होत आहेत.” अशा तीव्र शब्दात त्यांनी मोदींवर निशाणा साधला. पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन दिवसांच्या विरामानंतर बुधवारी पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर देशभरात विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचले.यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी विक्रम मोडला आहे. दरम्यान पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ४ मे २०२० पासून सातत्याने वाढत आहेत.








