प्रतिनिधी /पेडणे
नटवर्य प्रभाकर पणशीकर स्मृती महोत्सव आयोजन समिती आणि गोवा मराठी अकादमीतर्फे नटवर्य प्रभाकर पणशीकर स्मृती महोत्सव रविवार दि. 13 व सोमवार 14 मार्च असे दोन दिवस आयोजित करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन 13 रोजी सायं. 6 वा. पेडणेतील श्री भगवती मंदिर प्रांगणात होणार आहे. उद्घाटन सोहळ्य़ाला नाटय़कर्मी पंडित प्रसाद सावकार, ज्ये÷ शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर, ज्ये÷ रंगकर्मी आणि निवेदक डॉ. अजय वैद्य, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, नगराध्यक्षा उषा नागवेकर, श्री भगवती देवस्थान समितीचे उपाध्यक्ष विनोद सावळ देसाई, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रवीण कोटकर, गोवा मराठी अकादमीचे पेडणे प्रभाग अध्यक्ष अध्यक्ष चंद्रकांत सांगळे यांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती पेडणे येथे भगवती हायस्कूल सभागृहात आयोजन समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला श्री भगवती हायस्कूलचे मुख्याध्यापक केशव पणशीकर, व्हायकाऊंट हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र बोंदे, चंद्रकांत सांगळे, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रवीण कोटकर व आनंद नाईक उपस्थित होते.
नाटय़ कलाकारांचा सत्कार
उद्घाटन सत्रानंतर पेडणे तालुक्मयातील नाटय़कर्मी सर्वश्री चंद्रकांत कोटकर, आनंद चणेकर, विठ्ठल परब, मुरारी म्हामल, सुरेश बांदेकर, विलास परब आणि श्रीमती भानुमती मालपेकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
सायं. 7 वा. ओम कला आणि सांस्कृतिक केंद्र हळर्ण पेडणे प्रस्तुत नांदीचा कार्यक्रम होणार आहे.
सलाम नटवर्यास
सलाम नटवर्यास या कार्यक्रमात नाटय़प्रवेश, नाटय़संगीत, स्वगत, आठवणी आणि किस्से असा रंगतदार कार्यक्रम होणार आहे. यात अशोक समेळ, विघ्नेश जोशी, जान्हवी पणशीकर, रघुनंदन पणशीकर, क्षमा वैद्य, सुचेता अवचट, प्रतिभा कुलकर्णी, चित्रा साठे, स्नेहा परांजपे, कल्याणी जोशी, शिल्पा कोयंडे ,ज्योती ब्रह्मे, वीणा कट्टी, तरंगिणी खोत आणि रोहिदास परब, हेमंत केरकर यांचा सहभाग असेल.
सोमवार दि. 14 मार्च रोजी सायं. 6 वा. जान्हवी पणशीकर या ज्ये÷ नाटय़ कलाकार आणि निर्माती यांची प्रकट मुलाखत निलेश मोहन नाईक घेणार आहेत. सायं. 7 वा. श्री साई कला मंडळ सांगोडा प्रस्तुत तीन अंकी ऐतिहासिक नाटक ‘इथे ओशाळला मृत्यू’चा प्रयोग होणार आहे. नाटकाचे लेखक प्रा. वसंत कानेटकर, दिग्दर्शक अविनाश पुर्खे, सहाय्यक दिग्दर्शक दत्ताराम ठाकूर, नेपथ्य राजमोहन शेटय़े, पाश्वसंगीत निलेश नाईक तांत्रिक बाजू सांभाळणार आहे. यात भाग घेणारे कलाकार आहेत अविनाश पुर्खे, दत्ताराम ठाकूर, प्रशांत वझे, नूतन रेवोडकर, प्रेमानंद कलशावकर, पांडुरंग परब, नारायण हिरोजी, गुणाजी परब, बाबली कंदोळकर, दादू पार्सेकर, राजेंद्र भाईप, प्रमोद पुर्खे, कालिदास तुयेकर, अक्षय पुर्खे, राजन नाईक आणि विजय बर्डे हे कलाकार भाग घेतील.
पणशीकर यांचा नाटय़प्रवास दर्शवणारे फोटो प्रदर्शन
यावेळी खास आकर्षण ठरणार आहेत ते म्हणजे प्रभाकर पणशीकर यांचा नाटय़प्रवास दर्शवणारे फोटो प्रदर्शन. या दोन दिवस चालणाऱया महोत्सवाला नाटय़प्रेमींनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावून हा महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.









