जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा बळी
जिल्हा रुग्णालयातील तीन डॉक्टर, कणकवली ,सावंतवाडी मधील काही खाजगी डॉक्टर यांनाही कोरोनाची लागण
जिल्ह्यात कोरोना सक्रमनाचा धोका वाढला
संदीप गावडे /सिंधुदुर्गनगरी
कोरोनाचे सावट असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाला भक्तिमय वातावरणा मध्ये सुरुवात झाली मात्र धक्कादायक बाब म्हणजे गणेश चतुर्थी दिवशीच विक्रमी संख्येने 130 पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात आदळल्याने मोठी खळबळ उडाली आहे अजून एक धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचा सर्वत्र शिरकाव होऊ लागला असून जिल्हा रुग्णालयातील तीन डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत ,जी प मधील आणखी काही कर्मचारी आणि कणकवली व सावंतवाडी मधील काही डॉक्टरही पॉझिटिव्ह आले आहेत जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाला रोखण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आहे
जिल्ह्यात ऐन गणेशोत्सवामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागले आहे शनिवारी गणेशचतुर्थीच्या दिवशीच विक्रमी संख्येने 130 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधीत रूग्णांची एकूण संख्या 932 झाली आहे तर सक्रिय रुग्ण 423 झाले आहेत तसेच जिल्ह्यात आणखी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 10 रुग्ण बरे होऊन परतले आहेत
गणेशोत्सवासाठी जिल्ह्या बाहेरून आलेल्या व्यक्ती पासून कोरोनाचा संसर्ग झाला आहे त्याच बरोबर आता स्थानिक लोकांमध्ये सुद्धा कोरोनाचे सक्रमन वाढू लागले आहे तसेच नगरपालिका ,पोलीस ,आरोग्य कर्मचारी ,जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे
शनिवारी आलेल्या 130 पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयातील तीन डॉक्टर आहेत,तसेच , जी प तिल काही कर्मचारी,सावंतवाडी व कणकवली येथील काही डॉक्टर, पोलीस मुख्यालयातिल पोलीस आशा अनेक व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका मोठा वाढला आहे









