ऑनलाइन टीम / मेलबर्न :
ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेली भीषण आगीने 50 कोटींपेक्षा अधिक वन्य वन्य जीवांचा बळी गेला आहे. अजूनही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यातच पाण्याच्या समस्यानेही उग्र रूप धरण केले आहे. उंट जास्त पाणी पितात म्हणून पाण्यासाठी ऑस्ट्रेलियात 10 हजार उंटांची गोळय़ा झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे उंट मानवी वस्तीत येऊन पाण्याचा साठा संपवत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती.
या मुळे लोकांना उंटांचा मोठा त्रास होऊ लागला होता. याची दखल घेत तेथील प्रशासनाने व्यावसायिक शुटर्सना या उंटांना गोळय़ा घालून ठार करण्याचे आदेश दिले. या व्यावसायिक शूटर्सनी हेलिकॉप्टर्समधून उंटाना गोळय़ा घालून ठार केले.









