वृत्तसंस्था/ .रावळपिंडी
येथे सुरू असेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवशी यजमान पाकने दुसऱया डावात 6 बाद 129 धावा जमवित दक्षिण आफ्रिकेवर 200 धावांची आघाडी मिळविली आहे. या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डावा 201 धावा आटोपला.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत पाकने पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेवर 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत पाकचा पहिला डाव 272 धावांवर आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 106 या धावसंख्येवरून खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे सहा गडी 95 धावांची भर घालत तंबूत परतले.
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात एकाही फलंदाजीला अर्धशतक पार करता आले नाही. बवूमाने एकाकी लढत देत 138 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 44, मुल्डेरने 83 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 33, मार्करेमने 5 चौकारांसह 32, कर्णधार डिकॉकने 5 चौकारांसह 29 आणि लिनेडीने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 21 धावा जमविल्या. 65.4 षटकांत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 201 धावांत आटोपला. पाकतर्फे हसन अलीने 54 धावांत 5 गडी बाद केले. शाहीन अफ्रिदी, नौमन अली, अश्रफ प्रत्येकी एक गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेचे दोन फलंदाज धावचीत झाले. पाकने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या डावात 71 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली.
71 धावांनी आघाडी घेतलेल्या पाकने दुसऱया डावाला सुरूवात केली पण दक्षिण आफ्रिकेच्या अचूक गोलंदाजीसमेर त्यांचे 6 गडी 129 धावांत तंबूत परतले. पाकतर्फे अझहर अलीने 3 चौकारांसह 33, फईम अश्रफने 5 चौकारांसह 29, अबीद अलीने 1 चौकारांसह 13, कर्णधार बाबर आझमने 1 चौकारांसह 8, फवाद अलमने 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. मोहम्मद रिझवान 3 चौकारांसह 28 धावांवर खेळत आहे. तिसऱया दिवसाअखेर पाकने दुसऱया डावात 51 षटकांत 6 बाद 129 दावा जमविल्या.
दक्षिण आफ्रिकेतर्फे लिनेडीने 3 तर केशव महाराजने 2 व रेबाडाने 1 गडी बाद केला. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी असून दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिका बरोबरी करण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करेल तर पाकचा संघ बऱयाच वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकावर कसोटी मालिका मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.
संक्षिप्त धावफलक
पाक प. डाव-272, दक्षिण आफ्रिका प. डाव- 65.4 षटकांत सर्वबाद 201 (बेहुमा नाबाद 44, मार्करेम 32, मुल्डेर 33, डिकॉक 29, लिनेडी 21, डु प्लेसिस 17, एल्गार 15, हसन अली 5-54, शाहीद आफ्रिदी, नौमन अली आणि अश्रफ प्रत्येकी एक बळी), पाक दु. डाव 51 षटकांत 6 बाद 129 (अझहर अली 33, अबीद अली 13, बाबर आझम 8, फवाद अलम 12, मोहम्मद रिझवान खेळत आहे 28, अश्रफ 29,लिनेडी 3 बळी, केशव महाराज 2 बळी, रेबाडा 1 बळी).









