6 हजार परप्रांतियांना मिळणार आपल्या गावाला जायला मिळणार
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात असलेल्या परप्रांतियांना त्यांच्या गावाला सोडण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नियोजन केले. त्यानुसार मागणीनुसार सर्व तपासण्या करुन त्यांना टोकननंबर देण्यात येते.सातारा जिह्यातून 9 ट्रेन पाठवण्यात आल्या आहेत. तर अजून चार ट्रेन पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी संजय आसवले यांनी दिली. त्यामुळे या चार ट्रेनमधून सुमारे सहा हजार परप्रांतिय आपल्या गावाला जाणार आहेत.
जिह्यात कामानिमित्ताने आलेले अनेक मजूर आहेत. त्या मजूरांना सध्या लॉक डाऊनमुळे काम नाही. काम नसल्याने आपल्या गावी जाण्याकरता जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी होत होती. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लगेच राज्य शासनाच्या धोरणानुसार श्रमिक ट्रेनची सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. 9 ट्रेन पाठवण्यात आल्या आहेत. काल जाणारी ट्रेन काही तांत्रिक कारणास्तव रद्द झाली होती. त्या दोन दिवसात पुढे वातावरण पाहून पाठवण्यात येणार आहेत. उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगडला अशा चार जाणार आहेत. त्यातून प्रत्येक ट्रेनमधून पंधराशे पंधराशे असे सहा हजार प्रवाशी जाणार आहेत. त्यांना टोकन दिले आहेत. त्यांना कुठेही कसलीही गैरसोय होणार नाही, असे उपजिल्हाधिकारी संजय आसवले यांनी माहिती दिली. तर भाजपाकडून त्या परप्रांतियांची उपासमार होवू नये याकरता काळजी घेण्यात यावी, त्यांची सोय करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.









