मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना मुंबईच्या लोकलमधून प्रवासाची परवानगी दिल्याची घोषणा केली. येत्या १५ ऑगस्टपासून हा निर्णय लागू असणार आहे. मात्र, नेमकी प्रवासाची परवानगी कशी मिळेल, मुंबईकरांना पास कसा आणि कुठे मिळेल, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेलं मोबाईल अॅप कधी सुरू होणार? याविषयी मुंबईकरांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. त्यावर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
महापौर किशोरी पेडणेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, राज्य सरकार आणि रेल्वे मिळून ही योजना केली जात आहे. मुंबईतल्या ६५ रेल्वे स्थानकांवर लोकांना क्यूआर कोड मिळणार आहे. २ दिवसांत त्या मोबाईल अॅपची निर्मिती केली जाईल. ३२ लाख प्रवाशांसाठी या अॅपची निर्मिती केली जात आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना प्रवासाची मुभा दिली जाणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
दुसरा डोस घेऊन झाल्यानंतर १५ दिवसांनी पास मिळू शकणार आहे. त्यामुळे तिकीट खिडक्यांवर हुज्जत घालू नका. दुसरा डोस घेतल्यानंतर लगेच पास मिळणार नाही. कोणताही नियम तुमच्यासाठी केला जातो. त्यासाठी पालिका आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून अॅप तयार केलं जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








